16-18 वयोगटातील तरुणांना इन्स्टाग्राम आणि ‘फेसबुक रील’ द्वारे भविष्याबद्दलच्या आपल्या आकांक्षा आणि स्वप्ने प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करून, युवा भारताच्या आकांक्षा प्रदर्शित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मेटा इंडियाच्या सहयोगाने, नये भारत के सपने, अमृत जनरेशन मोहिमेचा केला शुभारंभ
16-18 वयोगटातील तरुणांना इन्स्टाग्राम आणि ‘फेसबुक रील’ द्वारे भविष्याबद्दलच्या आपल्या आकांक्षा आणि स्वप्ने प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करून, युवा भारताच्या आकांक्षा प्रदर्शित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज मेटा इंडियाच्या सहयोगाने, भारतातील युवा वर्गाला भविष्याबाबतच्या आपल्या आकांक्षा आणि स्वप्ने इतरांसमोर व्यक्त करायला प्रोत्साहन देऊन, सहभागाद्वारे त्यांना सक्षम बनवणाऱ्या अमृत जनरेशन (अमृत पिढी) मोहिमेचा, शुभारंभ केला.
अमृत जनरेशन मोहीम देशभरातील तरुणांना त्यांची सृजनशीलता प्रदर्शित करण्यासाठी आणि इन्स्टाग्राम आणि ‘फेसबुक रील्स’ च्या माध्यमातून त्यांच्या आकांक्षा इतरांसमोर मांडण्यासाठी प्रोत्साहन देईल. या उपक्रमाद्वारे, सहभागींना त्यांच्या महत्वाकांक्षा आणि मोठे झाल्यावर त्यांना काय बनायचे आहे, याचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे संघभावना वाढेल, आणि इतरांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल.
भारत सरकारच्या केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबीन इराणी म्हणाल्या, “आपले युवा उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत. देशातल्या युवा वर्गाला सहभागी करणे, प्रेरणा देणे आणि त्यांच्या आकांक्षांची जोपासना करणे तसेच त्यांची स्वप्ने साकारण्यासाठी आवश्यक असलेला पाठींबा आणि प्रोत्साहन देणे, हे अमृत जनरेशन मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या अर्थपूर्ण उपक्रमासाठी मेटा इंडिया बरोबर भागीदारी करताना आम्हाला आनंद वाटत आहे.”
अमृत जनरेशन मोहिमेत सहभागी होण्यासाठी, सहभागींनी केवळ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर, (#) अमृत जनरेशन हा हॅशटॅग वापरून एक रील तयार करून त्यामध्ये आपल्या आकांक्षा प्रदर्शित करणे आवश्यक आहे. पात्रता निकष आणि आपला प्रवेश दाखल करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांसह पुढील तपशील,फेसबुक GPA पेज आणि महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकारच्या सोशल मीडिया हँडलवर पाहता येईल.
या मोहिमेतील निवडक पन्नास प्रवेशांच्या उमेदवारांना नवी दिल्ली इथे आमंत्रित करून वरिष्ठ धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी संवाद साधण्याची आगळी संधी दिली जाईल, ज्याद्वारे त्यांना संबधित क्षेत्राबद्दल मौल्यवान दृष्टीकोन मिळेल आणि आपली स्वप्ने कशी पूर्ण करता येतील, याबाबतचे मार्गदर्शन मिळेल.
निवड झालेल्या युवा भारतीयांना गुरूग्राम येथील मेटा च्या कार्यालयाला भेट देण्याची आणि उद्योग क्षेत्रातील नेते आणि निर्मात्यांकडून अर्थव्यवस्थेच्या निर्मात्यांच्या क्षमता जाणून घ्यायची संधी मिळेल.
मेटा:
मेटा, लोकांना एकमेकांशी जोडले जाऊन, समुदाय शोधायला आणि व्यवसाय वाढवायला मदत करणारे तंत्रज्ञान निर्माण करते. 2004 मध्ये फेसबुकच्या आगमनाने लोकांना एकमेकांशी जोडण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला. मेसेंजर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या अॅप्सनी जगभरातील अब्जावधी लोकांना अधिक सक्षम केले. आता, मेटा, 2D स्क्रीनच्या पलीकडे, सामाजिक तंत्रज्ञानामध्ये पुढील उत्क्रांती घडवायला मदत करण्यासाठी, ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी यासारखे अद्भुत अनुभव देण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
प्रविष्टि तिथि: 07 JUN 2023 by PIB Mumbai
(रिलीज़ आईडी: 1930601) आगंतुक पटल : 41